शिकू.इन
प्रभाकर फौंडेशनने शिकू.इन ( www.shiku.in ) या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची नुकतीच स्थापना केली आहे.
शिक्षण क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानाने ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवून सर्वांगीण ग्रामविकास घडवून आणण्याचा हा प्रभाकर फौंडेशनचा एक प्रयत्न. ग्रामीण तरुणांना आर्थिक विकासात मार्गदर्शन करणे, शिक्षण, आरोग्य व समाज कल्याण विषयी जागरूकता निर्माण करणे या उद्दिष्टांनी या मुक्त व आभासी शिक्षण प्रणाली ची निर्मिती करण्यात आली आहे. साचेबंद शिक्षण पद्धती पासून वेगळ्या या उपक्रमात लाभार्थी आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार आवश्यक ते ज्ञान घेऊ शकतो. याला ना शिक्षणाची अट ना वेळेचे बंधन. सर्व विषय अतिशय सोप्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून सादर केले आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक विषयारील तज्ञ आपल्या शंकांचे तत्परतेने निराकरण करतील व प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींत योग्य सल्ला देतील.
प्रभाकर फौंडेशन एक स्वयंसेवी संस्था असून कंपनी अधिनियम २५ (१) अंतर्गत संस्थेची औपचारिक स्थापना २००६ साली ठाणे येथे करण्यात आली. शिक्षण व ग्रामीण विकास हे उद्देश समोर ठेऊन या संस्थेची स्थापना केली आहे. ठाणे व सोलापूर जिल्ह्यातील अनेक समविचारी स्वयंसेवी संस्था आणि ग्रामीण शाळांसोबत संस्था काम करत आहे.
Comments
Post a Comment